Pune Wanwadi Crime | पुणे : मित्रच झाला हैवान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जबरदस्तीने गर्भपात

0

पुणे : – Pune Wanwadi Crime | मैत्रीमध्ये ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व ती गर्भवती राहिल्यावर जबरदस्तीने गर्भपात केला. ही घटना वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीत घडली.

याबाबत 17 वर्षाच्या मुलीने गुरुवारी (दि.4) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रणव सुनील पवार Pranav Sunil Pawar
(रा. आनंदनगर, महंमदवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/जे/एन, 312, 354(अ), पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यापासून सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पीडित मुलीसोबत ओळख होती. त्याने मुलीसोबत मैत्री केली. ती अल्पवयीन असल्याचा आरोपीने गैरफायदा घेऊन तिला राहत्या घरी बोलून घेतले. मुलगी घरी आल्यानंतर त्याने जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलीने याबाबत आरोपीला सांगितले असता त्याने तिला जबरदस्तीने गोळ्या देवून तिचा गर्भपात केला. याबाबत पीडित मुलीने तक्रार देताच आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.