Pune Kondhwa Crime | अनधिकृत बांधकामाची तक्रार दिल्याने मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

0

पुणे : – Pune Kondhwa Crime | अनिधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) केल्याची तक्रार पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) अतिक्रमण विभागाकडे (PMC Encroachment Department) केल्याच्या रागातून तीन जणांनी एका व्यक्तीला शिवीगाळ करुन बेदम (Marhan) मारहाण केली. तसेच कुटुंबाला मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि.2) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोंढवा येथील बेलोसिमा अपार्टमेंटमध्ये (Bellisimo Apartments Kondhwa) घडला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पंकज श्रीकांत देवळे (वय-41 रा. बेलोसिमा अपार्टमेंट, कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आसिफ शेख (वय-30), जहिद शेख (वय-35), उमेश माने (वय-36 तिघे रा. बेलोसिमा अपार्टमेंट, कोंढवा खुर्द) यांच्यावर आयपीसी 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी व आरोपी एकाच सोसायटीत राहतात. सोसायटीमध्ये फ्लॅट धारकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत फिर्याद यांनी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे अर्ज केला आहे. या अर्जामध्ये आरोपी आसिफ शेख व उमेश माने यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाची माहिती दिली आहे. याचा राग मनात धरुन आरोपींनी मंगळवारी रात्री फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला.

आरोपींनी फिर्य़ादी यांना तु आमच्या विरुद्ध तक्ररी करतो, आमची खुप वरपर्यंत ओळख आहे असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करुन तुला इथे राहू देणार नाही अशी धमकी दिली. तसेच पत्नी व मुलाला मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (PI Santosh Sonawane), सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Survase) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.