Nashik Dindori Road Accident | बोलेरो-दुचाकीच्या भीषण अपघातात ५ ठार, नाशिक-दिंडोरी मार्गावरील दुर्घटना

0

नाशिक : नाशिक – दिंडोरी मार्गावर (Nashik Dindori Road Accident) ढकांबे गावाजवळ बोलेरो जीप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण ठार झाले. तर काही जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे वृत्त समजताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

आज दुपारी ढकांबे गावाजवळ नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकी आणि बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला. टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिकांनी मदतकार्य सुरु केले.

अपघातात जखमी झालेल्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृत व्यक्तींचे मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.