Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद

0

पुणे : – Pune Water Supply | गुरुवार 4 एप्रिल रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, वारजे रॉ वॉटर पंपिंग, गणपती माथा व जुने वारजे जलकेंद्र, एस.एन.डी.टी टाकी परिसर, कोंढवे-धावडे जलकेंद्र व रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र पंपिंग, भामा आसखेड तसेच नवीन लष्कर जलकेंद्र अशा अनेक ठिकाणी महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाकडून (PMC Water Supply Department) अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच शुक्रवारी (दि.5) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर – पाषाण, भूगाव रस्ता, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरूगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहस नगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हण मळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सूस रस्ता इ.

गांधी भवन टाकी परिसर – कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणूकानगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, गोकुळ नगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अर्थव वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क -1, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद, शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मी नगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, आर्चिड लेन 7 व 9, मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कालवा रस्ता इ.

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर – बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर इ.

वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर – कर्वेनगर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11, इंगळे नगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक 1 ते 10
एस.एन.डी.टी. (H.L.R.) टाकी परिसर – गोखले नगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी परिसर, रेव्हेन्हू कॉलनी, कोथरूड, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जय भवानी नगर, काळेवाडी, आयडीयल कॉलनी, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी इ.

कोंढवे-धावडे जलकेंद्र – वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे

जुने वारजे जलकेंद्र भाग – रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर, पठार, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदिप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इ.

वडगाव जलकेंद्र परीसर – तुकाईनगर, राम नगर, हिंगणे, आनंद नगर, माणिक बाग, दामोदर नगर, खोराड वस्ती, साईनगर, विश्रांतीनगर, आनंद विहार, महादेव नगर, वडगाव बु, धायरी, जाधव नगर, शेळके नगर, वडगाव बु गावठान, शांतीनगर, रेणुका नगरी परिसर, दाभाडी, गोसावी वस्ती, मिनाक्षी पुरम, भन्साळी कॉम्प्लेक्स, कात्रज आगम मंदिर, बालाजीनगर-दत्तनगर, टेल्को कॉलनी, संतोषनगर मुख्य रस्ता, दत्तनगर-आंबेगाव रस्ता, सुखसागर नगर, धनकवडी, आंबेगाव पठार, जाभूळवाडी रोड, धनकवडी गावठाण, तळजाई परिसर, सहकारनगर 1-2,

कात्रज-कोंढवा बुद्रुक परिसर – कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, सुखसागर नगर भाग 1-2, कात्रज-कोंढवा रोड, गोकुळनगर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकर नगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, काकडे वस्ती, साईनगर, राजीव गांधी नगर, खडीमशिन परिसर इ.

भामा आसखेड जलकेंद्र परिसर – लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी इ.
लष्कर ते खराडी पंपींग – खराडी गावठाण, तुळजाभवानी नगर, ईऑन परीसर, सातव वस्ती, तुकाराम नगर, चंदननगर, थिटे वस्ती, धनलक्ष्मी सोसायटी, आनंद पार्क, महावीर नगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी इ.

लष्कर जलकेंद्र अंतर्गत येणारा भाग – संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, गोसावी वस्ती, वैदुवाडी, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी, शेवाळवाडी, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवी कडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराई नगर (टँकर द्वारे पाणीपुरवठा बंद)

नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत येणारा भाग – मुळा रस्ता, खडकी कॅन्टोन्मेंट संपूर्ण परिसर, MES, HE Factory, हरीगंगा सोसायटी इ.

Leave A Reply

Your email address will not be published.