कुचकामी ठरेल तुमचे पॅनकार्ड! जर हे काम ३१ डिसेंबरपर्यंत केले नाही

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – जर तुम्ही तुमचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले नसेल तर तुमच्याकडे यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. आयकर विभागाने पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ दिली आहे. जर हे काम केले नाही तर केंद्रीय प्रत्यक्ष कर विभाग तुमचे पॅनकार्ड अमान्य जाहीर करू शकते. यानंतर अवैध पॅनसाठी जी कायदेशिर कारवाई असेल ती केली जाईल.

आयकर विभागाच्या या आदेशामुळे येत्या काही दिवसांत पॅनधारकांसाठी पॅन आणि आधार लिंक करणे जरूरी झाले आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन तसेच एसएमएसद्वारे करता येईल. आयकर विभागाने लागोपाठ सातवेळा यासाठी मुदतवाढ दिली असून ही शेवटची संधी आहे.

असे करा पॅन-आधार लिंक
तुम्ही तुमचे पॅन आणि आधार आयकर विभागाच्या टॅक्स ई-फाइलिंग पोर्टलद्वारे अथवा एसएमएसद्वारे लिंक करू शकता. आयकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर लिंक आधारचा पर्याय आहे. येथे तुम्हाला पॅन आणि आधार क्रमांक टाकावा लागेल. यानंतर ओटीपीद्वारे लिंक केले जाईल.

तसेच दुसरा पर्याय ५६७६७८ अथवा ५६१६१ वर एसएमएस पाठवू शकता. यासाठी तुम्हाला युआयडीपॅन<स्पेस><बारा आकडी आधार क्रमांक><स्पेस>< दहा आकडीपॅन क्रमांक टाकून मेसेज पाठवावा लागेल.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.