Pune Crime News | कन्सलटन्सी कंपनीतील महिलेचा विनयभंग, डेक्कन परिसरातील प्रकार
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | कन्सल्टन्सी कंपनी (Consultancy Company) काम करणाऱ्या कंपनीच्या रिपोर्टिंग मॅनेजरने (Reporting Manager) सहकारी महिलेसोबत द्विअर्थी संवाद साधून विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 2023 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत डेक्कन परिसरातील कन्सल्टन्सी कंपनीत घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत वारजे येथे राहणाऱ्या महिलेने बुधवारी (दि.29) डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन प्रसाद कुलकर्णी (Prasad Kulkarni) याच्यावर आयपीसी 354, 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला डेक्कन परिसरातील एका कन्सल्टन्सी कंपनी कामाला आहेत. आरोपी कंपनीत रिपोर्टिंग मॅनेजर या पदावर काम करत आहे. (Pune Crime News)
आरोपी प्रसाद कुलकर्णी याने फिर्यादी महिलेच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना जवळ ओढले.
तसेच त्यांच्यासोबत द्विअर्थी बोलून विनयभंग केला. आरोपीने मार्च 2023 पासून सप्टेंबर 2023 या कालावधीत
महिलेला वारंवार त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
त्याच्या त्रासाल वैतागून महिलेने बुधवारी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | चैन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
- ACB Trap News | 20 हजार रुपये लाच घेताना महापालिकेचा लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Mumbai-Pune Highway | मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताय? मग जाणून घ्या ३ तासांच्या ब्लॉकदरम्यान पर्यायी मार्ग
- Lalit Patil Drugs Case | राज्य सरकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. संजीव ठाकूरला का वाचवत आहेत?, आ. रविंद्र धंगेकरांचे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
- Gold-Silver Rate Today | सोन्याचा नवा विक्रम! चांदी देखील महागली, जाणून घ्या आजचे दर