Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime | थकीत वीज बिल (Light Bill Payments) तसेच वीज चोरी (Power Theft) प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला (Mahavitaran Worker) शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.30) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चाकण येथील शिक्षक कॉलनी (Shikshak Colony Chakan) परिसरात घडला.

याबाबत महावितरण कंपनीचे कर्मचारी वैजनाथ रामा इबतवार (वय-37 रा. पुणे नाशिक रोड, झगडे वस्ती, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन अनिकेत पंढरीनाथ येलवंडे (रा. मुटकेवाडी, शिक्षक कॉलनी, चाकण) याच्यावर आयपीसी 353, 336, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी चैतन्य लक्ष्मण शंकर हे चाकण येथील शिक्षक कॉलनी येथे थकीत वीजबील वसुलीसाठी गेले होते. यावेळी आरोपीने वीज बिल न भरल्यामुळे त्याला वीज बिल भरण्यासाठी सांगितले. त्यावेळी त्याने पैसे नसल्याचे सांगितले. आरोपीने यापूर्वी वीज बिल भरले नसल्यामुळे फिर्यादी यांनी त्याचे वीज कनेक्शन कट केले होते. मात्र, फिर्यादी यांना आरोपीच्या घरात वीज असल्याचे दिसून आले.

फिर्यादी यांनी मीटर बॉक्सची पाहणी केली असता आरोपीने त्याच्या किराणा दुकान व एचडीएफसी एटीएमच्या मीटरमधून वीज चोरून वापरत असल्याचे लक्षात आले. फिर्यादी यांनी याबाबत वरिष्ठांना कळवले. त्यांनी आरोपीचे पोल वरुन कनेक्शन कट करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांच्या सहकाऱ्याला विजेच्या खांबावर चढून कनेक्शन कट करण्यास सांगितले.

त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करत कनेक्शन कट करणासाठी पोलवर चढलेल्या चैतन्य शंकर यांच्यावर दगडफेक केली. तसेच तुम्हाला गाडीखाली घालून तुकडे करतो अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार फिर्यादी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित करत असताना आरोपी त्यांच्या जवळ आला. त्याने मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करुन हाताने मारहाण व धक्काबुक्की केली. तसेच पोलीसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.