Pune Accident Crime News | पुणे : अतिवेग जीवावर बेतला, नियंत्रण सुटल्याने बाईकची विजेच्या खांबाला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : – Pune Accident Crime News | पुण्यात भरधाव वेगातील बाईकला झालेल्या अपघातात एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास खडकवासला परिसरातील कुडजे येथे झाला. अपघातातील तरुण जळगावचे आहेत. जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) मयत तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
यशोधन अविनाश देशमुख (वय-23) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर हर्षल दिपक पाटील (वय-24) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघे तरुण जळगावचे असून पुण्यातील बावधनमधील पेंबल्स अर्बनीया सोसायटीमध्ये (Pebbles Urbania Bavdhan) राहतात. याबाबत पोलीस हवालदार सचिन प्रभाकर गायकवाड यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police) फिर्याद दिली आहे.
यशोधन आणि हर्षल हे खडकवासला (Khadakwasla) परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी यशोधन भरधाव वेगात दुचाकी चालवत होता. कुडजे गावातून मुख्य रस्त्याने पुढे आगळंबे फाट्याकडे जाताना साहिल हॉटेलच्या जवळ यशोधनचा बाईकवरील ताबा सुटला. यशोधन याच्या बाईकची विजेच्या लोखंडी खांबाला जाऊन जोरात धडकली. या अपघातात यशोधनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षल गंभीर जखमी झाला. या अपघातात बाईकचे नुकसान झाले. तसेच विजेचा खांब वाकला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.