Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : जमिनीच्या वादातून पिस्तुलाचा धाक दखवून मारहाण, दोघांना अटक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | खरेदी केलेल्या जमिनीचे फिनीशिंग व डेव्हलपींग करुन दिले नसल्याने शाब्दीक वाद सुरु असताना पिस्टल रोखून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास जुनी सांगवी येथील पी.डब्ल्यु.डी ग्राऊंडवर (PWD Ground Sangvi) घडली आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

याबाबत रोहित राजू राजपूत (वय 36, रा. लक्ष्मी नगर, पिंपळे गुरव) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्यादी दिली आहे. त्यानुसार संतोष सेतू पवार (वय 36, रा. कोथरूड), संदीप ढाणे, नवनाथ गोरे, सिद्धार्थ खजूरकर, विजय सरोदे यांच्या विरोधात आयपीसी 326, 143, 146, 147, 148, 149, 504, 506 सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संदीप ढाणे व विजय सरोदे यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पवार लॅन्ड डेव्हलपर्स आहे. फिर्यादी यांनी 2023 मध्ये हवेली तालुक्यातील रहाटवडे गावात अश्वीनी पवार यांच्या नावावर असलेले 22 गुंडे जमीन संतोष पवार याच्या मार्फत खरेदी केली आहे. जागा विकत देताना संतोष पवार याने जागेचे फिनीशिंग व डेव्हलपींग करुन देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र, संतोष पवारने ते काम पुर्ण केले नाही. याच कारणावरुन फिर्य़ादी व संतोष पवार यांच्या शाब्दीक वाद सुरु होते.

शुक्रवारी संध्याकाळी आरोपी संदीप ढाणे याने फिर्यादी जमिनीचा वाद मिटवण्याच्या बहाण्याने फोन करुन पी.डब्ल्यु.डी. ग्राउंडवर बोलावून घेतले. फिर्यादी त्याठिकाणी गेले असता संदीप याने फिर्यादी यांची कॉलर पकडून अंधारात नेले. त्याठिकाणी आरोपी संतोष पवार आधीपासूनच थांबलेला होता. त्याने रोहित राजपुत यांना शिवीगाळ करुन त्याच्याकडील पिस्टल फिर्यादीच्या दिशेने रोखले. त्यावेळी इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी वस्तु डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.