Pune Crime News | पुणे : अश्लील मेसेज करुन मेहुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल

0

पुणे : – Pune Crime News | लग्न समारंभात तसेच इतर कार्य़क्रमात मेहुणीची छेड काढून तिला मोबाईलवर अश्लील मेसेज करुन विनयभंग केला (Molestation Case). हा प्रकार फेब्रुवारी 2021 ते 7 फेब्रुवारी या दरम्यान पीडित महिलेच्या राहत्या घरी तसेच लग्न समारंभ व इतर कार्यक्रमादरम्यान घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police) हिंगोली (Hingoli) येथे राहणाऱ्या आरोपी मेहुण्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 37 वर्षीय महिलेने बुधवारी (दि.27) विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन एकावर आयपीसी 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांचा मेहुणा आहे. आरोपीने फेब्रुवारी 2021 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत वेळोवेळी प्रत्यक्षात, लग्न समारंभ व इतर कार्य़क्रमात अश्लील बोलून व एसएमएस करुन विनयभंग केला. तसेच पीडित महिलेच्या मोबाइल क्रमांकाच्या व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पत्नीला लाकडी बांबूने मारहाण

हडपसर : दारु पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला लाकडी बांबूने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि.27) माळवाडी हडपसर येथे घडला आहे. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) आरोपी राजेश ज्ञानोबा कांबळे याच्यावर आयपीसी 326, 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्य़ादी महिला घरामध्ये मुलीसोबत झोपली असताना आरोपीने दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने लाकडी बांबूने डोक्यात मारहाण केली. यामध्ये महिलेच्या कानामागील बाजूस फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.