Pune Crime News | पुणे : ‘झेप्टो’ कंपनीच्या डिलिव्हरी बॉय कडून मॅनेजरला मारहाण

0

पुणे : – Pune Crime News | मागील बऱ्याच दिवसांपासून डिलिव्हरी रेटिंग ‘झिरो’ किंवा ‘बॅड’ येत असल्यामुळे मॅनेजरने कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला कामात सुधारणा करण्याचा सल्ला दिला. याचा राग आल्याने डिलिव्हरी बॉयने कंपनीच्या मॅनेजरला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार शनिवारी (दि.30) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महंमदवाडी रोड (Mohammadwadi Road) वाडकर मळा (Wadkar Mala) येथे असलेल्या झेप्टो ऑनलाईन डिलेव्हरी कंपनीच्या समोर घडला. (Zepto Online Delivery Boy)

याबाबत किशोर विठ्ठल धोत्रे (वय-31 रा. गोसावी वस्ती, वैदूवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शाबाज रफिक शेख (वय-29 रा. सय्यद नगर, गल्ली नं. 26, महंमदवाडी रोड) व त्याच्या मित्रावर आयपीसी 504, 324, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झेप्टो ऑनलाईन कंपनीमार्फत नागरिकांना वेगवेगळ्या वस्तू घरपोच पुरवण्यात येतात. या कंपनीत किशोर धोत्रे मॅनेजर म्हणून काम करतात. तर आरोपी शेख डिलिव्हरी बॉयचे काम करतो. शबाज शेख याला मागील अनेक दिवसांपासून ‘झिरो’ किंवा ‘बॅड’ डिलिव्हरी रेटिंग येत आहे. त्यामुळे कंपनीचे नुकसान होत आहे. यावरुन फिर्य़ादी यांनी आरोपीला कामात सुधारणा करण्याचा व शिपमध्ये काम करण्याचा सल्ला दिला.

याचा राग आल्याने शाबाज याने धोत्रे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने त्याच्या मित्राला बोलवून घेतले. धोत्रे कंपनी बाहेर आले असता आरोपींनी त्यांना हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. लाकडी दांडक्याचा मार धोत्रे यांच्य ओठावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस नाईक संदेश राऊत करीत आहेत.

तर शाबाज शेख याने दिलेल्या तक्रारीवरुन किशोर धोत्रे यांच्यावर आयपीसी 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. शाबाज याने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता कंपनीचे मॅनेजर किशोर धोत्रे यांनी ‘झिरो’ किंवा ‘बॅड’ डिलिव्हरी रेटिंग येत असल्यावरुन बोलले. कंपनीला नुकसान होत असून ऑर्डर कमी होत असल्याने धोत्रे यांनी सर्व सर्व स्टाफ समोर शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच तू कामावरुन निघ, तुझी गरज नाही असे बोलून अपमानीत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.