IPL 2024 | आयपीएलची अंतिम लढत रंगणार चेन्नईत, मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचे वेळापत्रक जाणून घ्या

0

मुंबई : IPL 2024 | इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएलचा अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नईत होणार आहे. तर चेन्नईतच क्वालिफायर २चा सामना होईल. क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर हे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील.

हंगामाची सलामीची आणि अंतिम लढत आयपीएल परंपरेनुसार एकाच ठिकाणी म्हणजे चेन्नईतच होईल. आयपीएल काळातच लोकसभा निवडणुका असल्यातरी आयपीएल प्रशासनाने हंगाम भारतातच खेळवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई इंडियन्सचे उर्वरित सामने कधी, कोणाविरूद्ध आणि कुठे :

२४ मार्च – विरुद्ध गुजरात टायटन्स – अहमदाबाद
२७ मार्च – विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – हैदराबाद
१ एप्रिल – विरुद्ध राजस्थान रॉयल्स – मुंबई
७ एप्रिल – विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – मुंबई
११ एप्रिल – विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – मुंबई
१४ एप्रिल – विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – मुंबई
१८ एप्रिल – विरुद्ध पंजाब किंग्ज – मोहाली
२२ एप्रिल – विरुद्ध राजस्थान – जयपूर
२७ एप्रिल – विरुद्ध दिल्ली – दिल्ली
३० एप्रिल – विरुद्ध लखनौ – लखनौ
३ मे – विरुद्ध कोलकाता – मुंबई
६ मे – विरुद्ध हैदराबाद – मुंबई
११ मे – विरुद्ध कोलकाता – कोलकाता
१७ मे – विरुद्ध लखनौ – मुंबई

Leave A Reply

Your email address will not be published.