Pune Cheating Fraud Case | पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ‘एनडीए’तील कर्मचाऱ्याची 57 लाखांची फसवणूक

0

पुणे : – Pune Cheating Fraud Case | शेअर बाजारात गुंतवणुकीच्या (Investment In Share Market) आमिषाने फसवणूक (Cheating Fraud Case) करण्याचे प्रकार वाढत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील National Defence Academy (NDA) कर्मचारी तरुणाची 57 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार 19 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन घडला.

याबाबत 28 वर्षीय तरुणाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी एनडीए येथे कार्यरत आहेत. चोरट्यांनी तरुणाला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. चोरट्यांनी तरुणाला मेसेज पाठवून जाळ्यात ओढले. तरुणाला एका ग्रुपमध्ये अॅड करुन घेतले. तरुणाने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. त्यानंतर चोरट्यांनी त्याला परताव्या पोटी अडीच लाख रुपये दिले. त्यामुळे तरुणाचा विश्वास बसला.

चोरट्यांनी तरुणाला आणखी रक्कम गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार तरुणाने वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात 57 लाख 22 लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ शेख (Sr PI Yusuf Shaikh) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.