Pune Pimpri Chinchwad Crime News | बेरोजगारासह आयटी इंजिनिअरही टास्क फ्रॉडच्या जाळ्यात; आय टी कंपनीत चांगली नोकरी असताना पार्ट टाईम जॉबचा मोहात २० लाख गमावले

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पाठविलेल्या लिंकला लाईक करुन घरबसल्या पैसे कमवा, अशा टेलिग्राम टास्क फ्रॉडला (Telegram Task Fraud) बळी पडून एका आयटी कंपनीत चांगली नोकरी असलेला आयटी इंजिनिअर बळी पडला. अन् तब्बल २० लाख रुपये गमावून बसला. दुसरीकडे नोकरीच्या शोधात असलेला बेरोजगार तरुणही याला बळी पडून ७ लाख गमावून बसला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत थेरगावात राहणार्‍या एका ४० वर्षाच्या आयटी इंजिनिअर तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९/२४) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा मुळचा केरळचा राहणारा असून हिंजवडी येथील एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये डेव्हलपर इंजिनिअर म्हणून काम करतो. त्यांना मोबाईलवर एक मेसेज आला. त्यामध्ये लाईक केल्यास पैसे मिळतील, असे सांगण्यात आले होते. त्याबरोबर एक लिंक दिली होती. त्यावर क्लीक केल्यावर त्यामध्ये एक प्रॉडक्ट दिसले. त्याला लाईक करुन स्क्रीन शॉट त्यांनी पाठविला. त्यानंतर त्यांना एका ग्रुपमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले.
त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या रक्कमेचे प्रिपेड टास्क देण्यात आले. त्यानुसार ते पैसे भरत गेले.
त्यांच्या खात्यावर त्यांना पैसे जमा असल्याचे दिसत होते. त्यांनी पैसे परत मागितले.
तेव्हा त्यांना वेबसाईटवरुन आणखी प्रिपेड टास्क करावे लागतील, अन्यथा तुमचे पैसे बुडतील असे सांगितले गेले.
त्याप्रमाणे ते प्रिपेड टास्कसाठी पैसे भरत गेले. त्यात त्यांच्याकडील सर्व पैसे संपले. तरीही त्यांना आणखी पैसे मागितले. त्यांनी आता आणखी पैसे नाहीत असे कळविल्यावर आता तुमचे हे शेवटचे टास्क आहे.
अजून पैसे भरा म्हणजे तुमचे सर्व पैसे तुम्हाला परत मिळतील, परंतु, जर तुम्ही पैसे भरले नाहीत तर तुमचे सर्व पेसे बुडतील,
असे सांगितले. तेव्हा त्यांना आपली फसवणूक (Cheating Fraud Case) झाल्याचे लक्षात आले.
तोपर्यंत त्यांनी २० लाख ३२ हजार ७८७ रुपये गमावले होते. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

दुसरीकडे नोकरीच्या शोधात असलेल्या आणखी एका बेरोजगार तरुणाला सायबर (Cyber Crime) चोरट्यांनी ७ लाख
रुपयांचा गंडा घातला. याबाबत एका थेरगाव येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाने
वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७/२४) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण नोकरीच्या शोधात होता. नोकरीबाबत त्यांना मेसेज आला होता.
त्यांनी रिप्लाय दिल्यावर त्यांना टेलीग्राम टास्कमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले.
वेगवेगळ्या टास्कसाठी त्यांना ७ लाख ३ हजार २७० रुपये भरायला लावून त्यांची फसवणूक करण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.