Pune Bharti Vidyapeeth Crime | पुणे : वर्गात झालेल्या भांडणाच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Bharti Vidyapeeth Crime | वर्गात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांच्या टोळक्याने दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण केली. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात फरशी मारुन त्याला गंभीर जखमी केले. हा प्रकार गुरुवारी (दि.7) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आंबेगाव (Ambegaon PMP Bus Stop) स्मशानभूमीजवळ असलेल्या पी.एम.टी. बस स्टॉपजवळ घडला आहे.

या घटनेत आयुष विश्वकर्मा (वय-15 रा. अंजनी नगर, कात्रज) व विशाल सायबु कोळी (वय-16 रा. गुजरवाडी रोड, कात्रज, पुणे) हे दोघे जखमी झाले आहेत. याबबत विशाल कोळी याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vdiyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश लिंबकर, ओंकार पांडव (दोघे रा. संतोष नगर, कात्रज), व त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर दोन साथीदारांवर आयपीसी 324, 323. 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Bharti Vidyapeeth Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र आयुष हे दोघे दहावीचा इंग्रजीचा पेपर सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी पी.एम.टी बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबले होत.
आरोपी आणि आयुष यांच्यात वर्गात भांडण झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता.
याच रागातून आरोपींनी बस स्टॉप येथे येऊन आयुषला शिवीगाळ केली.
तसेच ‘तु लय बोलतो रे कोठे राहतो, तुला लय खाज आहे का’ असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी फिर्यादी विशाल कोळी याने भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली.
याचा राग आल्याने आरोपींनी रस्त्यावर पडलेली फरशी उचलून विशाल याच्या डोक्यात मारली.
यामध्ये तो जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वाय.आर. खोडे करीत आहेत.

Pune Karve Road Crime | गणेश मंदिरातून चांदीच्या दागिन्यांची चोरी, कर्वेरोड परिसरातील प्रकार

Pune Mundhwa Crime | पुणे : मोबाईल देण्यास नकार दिल्याने चाकूने वार, दोघांना अटक

Leave A Reply

Your email address will not be published.