Pune Karve Road Crime | गणेश मंदिरातून चांदीच्या दागिन्यांची चोरी, कर्वेरोड परिसरातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Karve Road Crime | कर्वेरोड परिसरातील एरंडवणे (Erandwane) येथील एका सोसायटीच्या गणेश मंदिरातून चोरट्यांनी चांदीचे व पितळेचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिरातून 17 हजार 600 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार अंबर बंगला, चैतन्यनगरी, एरंडवणे येथील सोसायटीच्या गणेश मंदिरात शुक्रवारी (दि.8) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला.

याबाबत रविंद्र रमेश कासट (वय-50 रा. अंबर बंगला, चैतन्यनगरी, कर्वेरोड, एरंडवणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे.
यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात आयपीसी 454, 457 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांनी त्यांच्या सोसायटीत असलेल्या सार्वजनिक चैतन्य गणेश मंदिराचा
दरवाजा गुरुवारी (दि.7) रात्री अकराच्या सुमारास बंद केला होता.(Pune Karve Road Crime)

अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास मंदीराच्या खिडकीचे गज कापून मंदिरात प्रवेश केला.
मंदिरातील गणेश मुर्तीवरील चांदीचे व पितळेचे दागिने चोरून नेले. तसेच दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरून नेले.
फिर्यादी शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास मंदीर उघडण्यासाठी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी तात्काळ डेक्कन पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी करुन चोरट्याचा शोध सुरु केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी करीत आहेत.

Pune Mundhwa Crime | पुणे : मोबाईल देण्यास नकार दिल्याने चाकूने वार, दोघांना अटक

Pune Crime News | प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा चालकाला बंडगार्डन पोलिसांकडून अटक

Leave A Reply

Your email address will not be published.