Pune Swargate Crime | न्युड फोटो अन् व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन तरूणीवर बलात्कार, मुकुंदनगरमधील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Swargate Crime | तरूणी राहत्या घरी झोपलेली असताना तिचे न्युड फोटो आणि व्हिडीओ (Nude Photos and Video) काढून ते तिच्या घरच्यांना तसेच बॉयफ्रेडला आणि सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देवुन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार (Pune Rape Case) केल्याप्रकरणी तरूणाविरूध्द स्वारगेट पोलिस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

सौरभ सुभाषचंद्र गुप्ता Saurabh Subhashchandra Gupta (30, रा. सी.जी.एच.एस. शासकिय क्वॉटर्स, मुकुंदनगर, पुणे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत तरूणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत तरूणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने सप्टेंबर 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान पिडीत तरूणी घरी झोपलेली असताना तिचे न्युड फोटो आणि व्हिडीओ काढले. ते तिच्या घरच्यांना, बॉयफ्रेडला तसेच सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी तरूणीला देवून तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले. आरोपीने फिर्यादीच्या व त्याच्या राहत्या फ्लॅटवर तरूणीस हाताने मारहाण केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Pune Police ACP-Inspector Transfers | पुणे पोलिस आयुक्तायातील 26 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या, नियुक्त्या ! 3 ACP सह 11 पोलिस निरीक्षकांचा समावेश

Lok Sabha Elections 2024 | अमित शहांची सायंकाळी संभाजीनगरमध्ये सभा, महाराष्ट्र दौऱ्यात सभा-बैठकांचा धडाका, जागावाटपाचा प्रश्न सोडवणार

Leave A Reply

Your email address will not be published.