Lok Sabha Elections 2024 | अमित शहांची सायंकाळी संभाजीनगरमध्ये सभा, महाराष्ट्र दौऱ्यात सभा-बैठकांचा धडाका, जागावाटपाचा प्रश्न सोडवणार

0

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Lok Sabha Elections 2024 | केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह (Amit Shah) आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज आणि उद्या ते मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अकोल्यात आहेत. तसेच जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यात शाह यांच्या जाहीर सभा होतील. आज अकोला त्यानंतर जळगाव आणि संध्याकाळी संभाजीनगरमध्ये अमित शाहांची जाहीर सभा होईल. या दौऱ्यात अमित शाह हे महायुतीच्या जागावाटपाचा तिढा देखील सोडवण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Elections 2024)

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह बैठका घेणार आहेत. यावेळी ते महायुतीच्या जागावाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान, अमित शहा यांची आज सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे. यामुळे शहरात कडेकोट बंदोबस्त आहे. या सभेला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे, संदिपान भुमरे, राधाकृष्ण विखे, अतुल सावे,

पंकजा मुंडे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.

Pune Court News | लाच प्रकरणात वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकाऱ्याला CBI विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर

Leave A Reply

Your email address will not be published.