Pune Kondhwa Crime | पुणे : कोंढव्यात घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलगी गरोदर राहून तिने एका बाळाला जन्म दिला आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील डोंबिवली ईस्ट येथील एका सोसायटीत घडला आहे. याप्रकरणी कोंढवा येथे राहणाऱ्या पीडित मुलीने मंगळवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे 2023 मध्ये घडला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

याबाबत कोंढवा खुर्द येथे राहणाऱ्या 18 वर्षीय पीडित मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन डोंबिवली ईस्ट येथील वामन वजे हाईट्स मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीवर (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) आयपीसी 376, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील आरोपी राहात असलेल्या मानपाडा सर्कल येथील वामन वजे हाईट्समध्ये कामाला होते. (Pune Kondhwa Crime)

पीडित मुलगी वडिलांना मदत करण्यासाठी बिल्डिंगमध्ये घरकाम करण्यासाठी जात होती.
मुलगी आरोपीच्या घरात घरकाम करत असल्याने दोघांची ओळख झाली होती. मे 2023 रोजी पीडित मुलगी
बिल्डिंगच्या टेरेसवर पाणी बंद करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी टेरेसवर आला.
त्याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक सबंध ठेवले.

यानंतर आरोपी मुलीला याबाबत कोणाला काही सांगितले तर घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, मुलगी गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिला. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी आरोपीविरोधात
गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा डोंबिवली पोलिसांकडून कोंढवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव करीत आहेत.

Pune Sinhagad Road Murder | धायरीत जागेच्या वादातून तरुणाचा खून, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Video)

Pune Crime News | पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरुन चोरी; लोखंडी पिनद्वारे करत होता गॅस ट्रान्सफर

Pune Khadak Crime | पुणे : घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी, ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन

Leave A Reply

Your email address will not be published.