Ketaki Chitale On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचा व्हिडिओ व्हायरल, म्हणाली ”पोलीस महानालायक असतात…” (Video)

0

पुणे : Ketaki Chitale On Porsche Car Accident Pune | पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय झाले आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत असून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. दरमयान, या अपघात प्रकरणावर वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये तिने पोलिसांना (Pune Police) चांगलेच सुनावले आहे. (Kalyani Nagar Accident)

केतकी चितळे हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि त्या अल्पवयीन मुलाची काही चूक नव्हती, असा पोलिसांनी प्लॅन करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांचा हा प्लॅन फसला. पोलीस महानालायक असतात हे आपल्याला माहित आहे.

तसेच केतकीने तिच्या लेट्स टॉक युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, जे लोक या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करायला गेले होते, त्यांनाच पोलिसांनी अरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं, ही गोष्ट नवीन नाहीये.

माझ्यावर तर डायरेक्ट डेथ थ्रेट देण्यात येत होते. तेव्हा कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये मी गेले होते, ही केतकी तुच कशी? असे प्रश्न मला पोलिसांनी तेव्हा विचारले होते, अशी आठवण केतकी हिने सांगत पोलिसांवर टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.