Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क येथील फ्लॅटमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क परिसरातील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत थायलंड येथील दोन महिलांची सुटका करुन महिला स्पा मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.15) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरातील साऊथ मेन रोड येथील सुखवाणी क्लासिक मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर आठ येथे केली आहे.

मूकडा गेटाईसॉन्ग (MOOKDA GAETHAISONG STATE – THAILAND) हीच्यावर आयपीसी 370 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार रईसा समीर बेग (वय-38) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Koregaon Park Crime)

कोरेगाव पार्क येथील सुखवाणी क्लासिक मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर छापा टाकून थायलंड येथील दोन महिलांची सुटका केली. आरोपीने पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून थायलंड येथून ब्युटी पार्लरचे काम करण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन तिच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होती. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे करीत आहेत.

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून कोयत्याने तोडफोड

ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी 5 लाखांची लाच घेणारे मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात सात जण जखमी (Video)

Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR (Video)

Pune Hadapsar Crime | पुण्यात सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) मुलाच्या दुकानातून 2 कोटींचे सोने पळवले

Leave A Reply

Your email address will not be published.