Pune BJP Dheeraj Ghate On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाड याला पुण्यात फिरू देणार नाही’ – धीरज घाटे

0

पुणे: Pune BJP Dheeraj Ghate On Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्या समोर झालेल्या आंदोलनात मस्तवाल पणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) म्हणाले की ज्यांच्या पक्षाचे नेते पदोपदी शाहू फुले आंबेडकर यांच्या नावे राजकारण करत असतात त्यांच्या पक्षातील विकृत आमदारावर कथाकथित जाणते राजे कारवाई करणार का असा सवाल आमदार कांबळे यांनी केला.

आमदार सातपुते (Ram Satpute) म्हणाले की महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे अशी वल्गना केली परंतु प्रत्यक्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून त्यांनी नक्की महाविकास आघाडीची मानसिकता स्पष्ट झाली आहे हे कृत्य म्हणजे देशाचा अपमान आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड या विकृतावर तातडीने राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही करत आहोत.

शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की जितेंद्र आव्हाड ही विकृती आहे ही विकृती भारतीय जनता पार्टी ठेचून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही आव्हाड यांना पुण्याच्या अनुभव आहे त्यामुळे जर कारवाई झाली नाही तर जितेंद्र आव्हाडला पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा घाटे यांनी दिला.

यावेळी आमदार सुनील कांबळे, आमदार राम सातपुते शहराध्यक्ष धीरज घाटे , अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष भीमराव साठे , सरचिटणीस राघवेंद्र मानकर माजी नगरसेवक दीपक पोटे, राजेश येनपुरे किरण कांबळे अतुल साळवे राजेंद्र काकडे गणेश यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.