Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Suspended | पुणे : डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हाळनोर यांचे निलंबन, महाराष्ट्र शासनाकडून आदेश जारी

पुणे : – Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Suspended | कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Kalyani Nagar Accident) आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल (Swapping Blood Sample) केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केलेल्या ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे व डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक केली आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी व उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव मनोहर बंदपट्टे यांनी तावरे व हाळनोर यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) केलेल्या वैद्यकीय तपसणी व उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराची समितीने चौकशी केली होती. या चौकशीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त यांना बुधवारी (दि.29) सादर करण्यात आला. आयुक्तांनी प्राध्यापक व विभाग प्रमुख न्यायवैद्यकशास्त्र डॉ. अजय तावरे व वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार तावरे व हाळनोर यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. (Porsche Car Accident Pune)

डॉ. अजय तावरे व डॉ. श्रीहरी हाळनोर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 च्या नियम 4 च्या पोट नियम-1 नुसार त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. तसेच जोपर्यंत निलंबनाचे आदेश आहेत तोपर्यंत त्यांना निर्वाह भत्ता आणि पूरक भत्ते दिले जातील. निलंबन काळात खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.