Pune Bharti Vidyapeeth Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Bharti Vidyapeeth Crime | बेकायदेशिररित्या पिस्टल व जिवंत काडतुस बाळगल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून 40 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई बुधवारी (दि.7) भुमकर चौकाकडून स्वामी नारायण मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर केली.(Pune Bharti Vidyapeeth Crime)

राधेमोहन उर्फ मुन्ना सिताराम पिसे (वय-20 रा. यशोदिप चौक, वारजे माळवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर व निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे यांना माहिती मिळाली की, भुमकर चौकातून स्वामी नारायण मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती कमरेला पिस्टल लावुन थांबला आहे. माहितीची खात्री करुन तपास पथकाने त्याठिकाणी जाऊन परिसरात आरोपीचा शोध घेतला. पथकाने राधेमोहन पिसे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 40 हजार रुपये किंमतीचे पिस्टल व 200 रुपयांचे एक काडतुस आढळून आले. पोलिसांनी पिस्टल व काडतुस जप्त केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदीनी वग्याणी
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता,
पोलीस अंमलदार चेतन मोरे, निलेश ढमढेरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, निलेश जमदाडे, शैलेश साठे, मंगेश पवार,
हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, राहुल तांबे,
विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

Pune Crime Court News | पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता
Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचे आजपासून बेमुदत उपोषण, मराठा बांधवांना केले आवाहन, ”सर्व आमदारांना फोन करा…”

Leave A Reply

Your email address will not be published.