Pune Crime Court News | पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime Court News | बलेनो कारचा नंबर बदलून कागदपत्रे बनवुन देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केली. तसेच फिर्यादी यांच्या बहिणीला क्रेडिटवर चार तोळे वजानाचे सोन्याचे कडे घेऊन देतो असे सांगून पैसे घेत आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात किरण सुरेश छेत्री (वय-34 रा. लोहगाव, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वडगाव शुभांगी कातकर यांनी आरोपी किरण छेत्री याची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती आरोपीचे वकील जे.एन. पाटील यांनी दिली आहे. (Cheating Fraud Case)

फिर्यादी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी किरण छेत्री याच्यावर आयपीसी 420, 170, 384, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर यांनी सांक्षीदारांचे जबाब नोंदवून आरोपीविरुद्ध वडगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीच्या वतीने अॅड. जे.एन पाटील यांनी युक्तीवाद केला. तर सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता अॅड. यु.पी. ठाकरे यांनी युक्तीवाद केला.(Pune Crime Court News)

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. तसेच अभियोग पक्षाचे दोन्ही साक्षीदार हे फितुर झालेले आहेत,
त्यामुळे तक्रारीमधील मजकूर शाबीत होऊ शकला नाही. तसेच अभियोग पक्ष वाजवी संशयाच्या पलीकडे जाऊन
दोषारोप शाबीत करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी आरोपी किरण छेत्री याची गुन्ह्यातून निर्दोष
मुक्तता केली. तसेच आरोपीकडून जप्त केलेला मुद्देमाल परत करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचे आजपासून बेमुदत उपोषण, मराठा बांधवांना केले आवाहन, ”सर्व आमदारांना फोन करा…”
Accident On Samriddhi Highway | समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात; 3 ठार, 2 जखमी

Leave A Reply

Your email address will not be published.