Pune Police News | तृतीयपंथीयाची माणुसकी अन् मुंढवा पोलिसांची सतर्कता, परराज्यातून पळून आलेला 16 वर्षाचा मुलगा सुखरूप कुटुंबियांच्या ताब्यात

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police News | महिलांसारखे राहणे, मेकअप करणे, महिलांसारखे हावभाव करण्याची आवड निर्माण झाली, मात्र याबाबत घरात कोणाला काहीही सांगण्याची हिंमत न झाल्याने राजस्थान येथील एक 16 वर्षाचा मुलगा घर सोडून पुण्यात पळून आला. मुंढवा पोलिसांनी (Pune Police News) त्याची चौकशी करून समुपदेशन करुन त्याला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात सुखरुप दिले. मुलगा परत मिळाल्याने त्याच्या घरच्यांनी मुंढवा पोलिसांचे आभार मानले.

मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीतील ताडीगुत्ता चौक येथे एका तृतीयपंथीयासोबत एक लहान मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलगा लहान असल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी पोलीस पथकाला पाठवून खातरजमा केली. तृतीयपंथी शिवाज्ञा रोहित रॉय (रा. येरवडा) याच्या सोबत करण रवि कंडा (वय-16 रा. हनुमानगढ, राजस्थान) या दोघांना मुंढवा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

पोलिसांनी करण याच्याकडे चौकशी केली असता त्याने घरात कोणाला काही एक न सांगता पुण्यात आल्याचे सांगितले.त्याला विश्वासात घेऊन घर सोडून येण्याबाबत विचारले असता त्याने सांगितले, महिलांसारखे राहणे, मेकअप करणे, महिलांसारखे हावभाव करण्याची आवड निर्माण झाली, मात्र याबाबत घरात कोणाला काहीही सांगण्याची हिंमत न झाल्याने घर सोडून पुण्यात पळून आल्याचे सांगितले. तसेच तृतीयपंथी शिवाज्ञा रॉय याने देखील करण याला चुकीचा मार्ग न दाखवता, तो नैराश्यात असल्याने त्याला आधार देवून आपल्या जवळ ठेवून घेत त्याला सहारा देवून माणुसकी जपली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी त्याला नैराश्येतुन बाहेर काढून समुपदेश केले. आयुष्य किती सुंदर आहे, आयुष्यात जगताना कुटूंबियाची आवश्यक असलेली साथ, तसेच तृतीयपंथीसाठी शासनाकडून भेटणाऱ्या सुविधा याची माहिती देवून त्याला चांगल्या व वाईट घटनांची उदाहरणे देऊन त्याच्या मनामध्ये चांगले जीवन जगण्याची आशा पल्लवीत केली. मुंढवा पोलिसांनी हनुमानगढ पोलीस ठाण्यात संपर्क करुन मिसिंग मुलगा मिळाला असल्याची माहिती दिली तसेच मुलाच्या पालकांना मुंढवा येथे घेऊन येण्यास सांगितले. हनुमानगढ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दारीया सिंह आणि मुलाचे नातेवाईक अशोक कुमार व विजय कुमार हे मुंढवा पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मुलाला सुखरुप त्यांच्या स्वाधीन केले.

करण कंडा याने मुंढवा पोलिसांचे आभार मानले. तसेच केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून यापुढचे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगून मोठा अधिकारी होऊन पुन्हा भेटायला येईल असे आश्वासन दिले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या सचूनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, पोलीस अंमलदार रमेश उगले, सचिन मेमाणे यांच्या पथकाने केली.

NCP MP Supriya Sule | भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, ”राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ…” (Video)
Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : एकत्रित तपासासाठी विठ्ठल शेलारसह 7 आरोपींना पोलीस कोठडी

Leave A Reply

Your email address will not be published.