Solapur Karmala Accident News | शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या चार भाविकांचा कार अपघातात मृत्यू; आठ महिन्यांची मुलगी बचावली

0

पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Karmala Accident News | शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कार आणि कंटेनरची धडक झाली ज्यात चार जणांचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले. सुदैवाने यात आठ महिन्यांची मुलगी बचावली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास सोलापुर जिल्ह्यातील करमाळा (Solapur Karmala Accident News) तालुक्यात पांडे गावाजवळ घडली.

घटनेत श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्योती दीपक हुनशामठ (३८ रा. कलबुर्गी) व शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) या चार जणांचा मृत्यू झाला. तर सौम्या श्रीधर कुंभार (वय २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशैल कुंभार (वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय ८ महिने) आणि तवेरा चालक श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय २६) जखमी झाले आहेत. (Solapur Karmala Accident News)

कर्नाटकातील कलबुर्गी, हुबळी, बागलकोट भागातील एकमेकांचे नातेवाईक असलेले भाविक देवदर्शनासाठी तवेरा गाडीतून निघाले होते. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर हे भाविक तुळजापुरात मुक्काम करून बार्शी-परांडा-करमाळामार्गे (Via Barshi-Paranda-Karmala) पुढे शिर्डीकडे जाण्यासाठी निघाले होते.

करमाळा तालुक्यातील पांडे गावच्या हद्दीत तवेरा व कंटेनर यांची जोरात धडक झाली.
अपघातानंतर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली पालथी होऊन अक्षरशः चक्काचूर झाली.
अपघातानंतर कंटेनर चालकाने पलायन केले.
अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस (Karmala Police) घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना करमाळ्यातील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.