Accident On Samriddhi Highway | समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात; 3 ठार, 2 जखमी

0

अहमदनगर : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Accident On Samriddhi Highway | काल रात्री साडेअकराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर स्विफ्ट डिझायर कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 3 जण ठार आणि 2 जण जखमी झाले. हा अपघात अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवार हद्दीत घडला. अपघातातील मृत हे जालना जिल्ह्यातील आहेत. (Ahmadnagar Accident News)

मृतांमध्ये राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठने ( सर्व रा. जाफराबाद, जिल्हा जालना) यांचा समावेश आहे. तर फलके आणि वाघ हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांची पूर्ण नावे समजू शकली नाहीत. जखमींना उपचारासाठी वैजापूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावर एका कंटेनरमधून चॅनल खाली पडल्याने
तो उचलण्यासाठी कंटेनर थांबला होता. हा चॅनल चालक उचलत असताना जालन्याकडून शिर्डीकडे निघालेल्या भरधाव कारने कंटेनर चालकाला उडवले आणि कार कंटेनरवर जाऊन आदळली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी आले. यानंतर तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात
शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Nikhil Wagle On Pune Police | कालचा हल्ला पुणे पोलिसांच्या संगनमताने, पत्रकार निखिल वागळे यांचा गंभीर आरोप
Pune Wanwadi Crime | वानवडी पोलिसांकडून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्या उध्वस्त (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.