Pune Pimpri Chinchwad Crime News | कर्ज मंजूर करुन देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक, चार जणांवर FIR; कोथरुड परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | सरकारी बँकेतील पॅनेलवर कन्स्लटंट असल्याचे सांगून लोन मंजूर (Loan Approved) करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 28 लाख 22 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली. पैशांची मागणी केली असता शिवीगाळ करुन बघुन घेण्याची धमकी दिली. हा प्रकार 2 सप्टेंबर 2022 ते 23 एप्रिल 2023 या कालावधीत अॅडव्हान्स कॅड टेक्नोलॉजीस प्रा. लि. (Advance Cad Technologies Pvt Ltd) येथे घडला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Pune Police) चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत मिलींद दादाजी फुटाणे (वय-49 रा. कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) सोमवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. यावरुन विनोद रवींद्र शेंडगे, अक्षय विनोद शेंडगे, प्रशांत भालचंद्र बंडेवार, रोहन चंद्रशेखर मेटकरी यांच्यावर आयपीसी 420, 406, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अॅडव्हान्स कॅड टेक्नोलॉजीस प्रा. लि. काम करतात.
सरकरी बँकेतील (Government Bank) पॅनेलवरील कन्स्लटंट (Consultant) असल्याचे आरोपींनी फिर्यादी यांना सांगितले.
सरकारी बँकेतून लोन मंजूर करुन देण्याचे आश्वासन देऊन आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. लोन मंजूर करुन देण्याच्या बहाण्याने फुटाणे यांच्याकडून 28 लाख 22 हजार 400 रुपये ट्रान्स्फर व रोख स्वरुपात घेतले.

मिलींद फुटाणे यांनी पैसे दिल्यानंतर लोनबाबत आरोपींकडे विचारणा केली.
मात्र, लोन मंजूर करुन न देता आरोपींनी विश्वासघात करुन फसवणूक केली.
पैसे परत मागितले असता टाळाटाळ करुन फिर्यादी यांचे मानसिक खच्चीकरण केले.
तसेच पुण्यातून हुसकावून लावण्याची व बघुन घेण्याची धमकी देऊन शिवीगाळ करुन आर्थिक फसवणूक केल्याचे
फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.