Nagpur Accident News | लग्नावरुन परतणार्‍यांवर काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत कारमधील 6 जणांचा मृत्यु

0

नागपूर : Nagpur Accident News | लग्नावरुन परत येत असताना भरधाव कार ट्रकला जाऊन धडकल्याने कारमधील ६ जणांचा मृत्यु झाला. हा अपघात नागपूर जिल्ह्यातील काटोल मार्गावरील सोनखांब आणि चारगावमधील शिवाराजवळ मध्यरात्री घडला. (Nagpur Accident News)

मयूर इंगळे (वय ३६), वैभव चिखले (वय ३९), सुधाकर मानकर (वय ४२), विठ्ठल थोटे (वय ४५), अजय चिखले (वय ४५) व रमेश हेलोंडे (वय ४८, सर्व रा़ मेंढेपठार, ता. कटोल) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. तर जगदीश ढोणे यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. (Nagpur Accident News)

हे सर्व रहिवासी काटोल तालुक्यातील मेंढेपठार गावातील रहिवासी होते. मेंढेपठार गावातील चंद्रशेखर चिखले यांच्या
मुलीचे लग्न नागपूरला होते. त्यासाठी हे सर्व जण नागपूरला आले होते. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर कारने गावी परत
जात होते. यावेळी त्यांची कार भरधाव असताना एका ट्रकला वेगाने धडकली. त्यात कारचा चुराडा झाला.
कारमधील ६ जणांचा जागीच मृत्यु झाला असून एकावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.