Pune Crime News | ‘तु लय मोठा भाई झालास का?’ म्हणून दोन भावांना बेदम मारहाण; कोथरुड परिसरातील घटना, दोघांना अटक

Attempt to kill

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | छक्का लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन भावांना मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. तसेच ‘तु लय मोठा भाई झालास का? याला आता जीवंत सोडायचे नाही, आजच संपवून टाकु’ असे म्हणत लोखंडी रॉड डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. हा प्रकार कोथरुड मधील पौड रोडवरील म्हसोबा मंदिरासमोरील फुटपाथ जवळ मंगळवारी (दि.12) रात्री साडे नऊच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Pune Police) दोघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

सिद्धार्थ मराठे व विश्वजीत पांचगणे यांच्यावर आयपीसी 307, 352, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याबाबत मनोज भाऊ भगत (रा. जय भवानी नगर, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुरुवारी (दि.14) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी मनोज भगत याचा भाऊ म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यावरुन जात
असताना आरोपी सिद्धार्थ मराठे याचा धक्का लगला. याचा जाब विचारला असता आरोपींना याचा राग आला.
त्यांनी फिर्यादी यांच्या भावाला हाताने मारहाण केली. तेव्हा फिर्यादी हे त्याठिकाणी आले.
त्यांनी भावाला का मारले? अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी रोडच्या कडेला असलेला लोखंडी रॉड घेऊन आले.

‘तु लय मोठा भाई झालास का, तु कोण मला विचारणारा, तुला आत्ता खल्लास करून टाकतो’ असे म्हणत
लोखंडी रॉड फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी माराहाण केली. याला आता जीवंत सोडायचे नाही, आजच संपवून टाकू असे
म्हणत पुन्हा लोखंडी रॉड डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे (PSI Jalandar Fadtare) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा