MLA Disqualification Case | आमदार अपात्रता प्रकरण : राऊतांची विधानसभा अध्यक्षांवर टीका, ”दीड वर्षांपासून डमरू वाजवण्याचा खेळ…”

0

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रतेप्रकरणी (MLA Disqualification Case) ३१ डिसेंबरपर्यंत निकाल देता येणार नसल्याने नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे (Supreme Court) मुदतवाढ मागितली आहे. याप्रकरणी आज निर्णय होणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी अध्यक्षांवर टीका केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून नार्वेकर यांचा डमरू वाजवण्याचा खेळ चालू आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. (MLA Disqualification Case)

संजय राऊत यांनी म्हटले की, राज्यातील सरकार अस्थिर आणि घटनाबाह्य आहे. कोर्टात तारखा पडून घेतल्या जात आहे.
कोर्टाकडून तारखा वाढवत आहेत. विधानसभा अध्यक्ष डमरू वाजवत बसले आहेत. जे निकाल देणार त्यांनीच पाच वेळा पक्षांतर केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले,
बेरोजगारी महागाईचा मुद्दा आहे. कांदा इथेनॉल प्रकरणी राज्यातील लोक आक्रमक आहे.
मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कशासाठी दिल्लीला येत आहे माहित नाही. (MLA Disqualification Case)

ते पुढे म्हणाले, दोन्ही उपमुख्यमंत्री बहुतेक संसदेची सुरक्षा पाहायला येत आहेत. बेरोजगारी, महागाईचा मुद्दा आहे.
कांदा इथीनोल प्रकरणी राज्यातील लोक आक्रमक आहेत. सरकार अस्थिर आणि घटनाबाह्य आहे. त्यांनी दिल्ली मुंबईचा पास काढलेला दिसत आहे. त्यांच्या दौऱ्याचा राज्याला काय उपयोग? असा प्रश्न राऊत यांनी विचारला.

धारावी पुनर्विकासासंदर्भात ठाकरे गटाच्या मुंबईतील मोर्चाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही.
याबाबत राऊत म्हणाले, जे उद्योगपती या देशाचे जावई आहेत त्यांच्या घशात घालायचा हा डाव आहे.
आम्ही मोर्चा काढणारच आहे. कारण आमचा आवाज मुंबई वाचवण्यासाठी आहे. धारावीची जनता आमच्यासोबत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.