Pune Crime News | मोबाईल शॉपीमधील फिश पॉट डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न, दोघांवर FIR; हडपसर परिसरातील घटना

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | दुरुस्तीसाठी टाकलेल्या मोबाईल बाबत विचारना करुन दुकानदाराला हाताने मारहाण करुन दुकानाची तोडफोड केली. तसेच दुकानातील फिश पॉट डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.13) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास भेकराईनगर येथील सह्याद्री मोबाईल शॉपीमध्ये घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत अरविंद जगन्नाथ दोडमिसे Arvind Jagannath Dodmise (रा. ग्रीन फाउन्टी फेज-1, फुरसुंगी) यांनी गुरुवारी (दि.14) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून मनीष सुरवसे (रा. ढमाळवाडी, हडपसर), शुभम कारडे (रा. हडपसर) यांच्यावर आयपीसी 324, 504, 506, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भेकराईनगर (Bhekrainagar) येथे सह्याद्री मोबाईल शॉपी नावाचे
दुकान आहे. आरोपींनी सहा महिन्यापूर्वी फिर्यादी यांच्या दुकानात मोबाईल दुरुस्त करण्यासाठी टाकला होता.
याबाबत आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी मी तुम्हाला तुमचा मोबाईल शोधुन देतो असे फिर्यादी यांनी सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करुन फिर्यादी यांना हाताने मारहाण (Beating) केली. आरोपींनी फिर्यादी यांचा मोबाईल व दुकानातील काच फोडून नुकसान केले. तसेच दुकानातील फिश पॉट अरविंद दोडमिसे यांच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस नाईक एस.जे. ननावरे (Police Naik S.J. Nanavare) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- NEMS School Pune | युद्धकला आणि शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकानी रंगला एन.ई.एम.एस. शाळेचा वार्षिक क्रीडा दिन 850 विद्यार्थांनी घेतला सहभाग
- Pune Crime News | ‘तु लय मोठा भाई झालास का?’ म्हणून दोन भावांना बेदम मारहाण; कोथरुड परिसरातील घटना, दोघांना अटक
- Manoj Jarange Patil | ”फडणवीस त्यांना बोलायला लावतात, म्हणून ते बोलतात”, नितेश राणेंच्या टीकेवर जरांगेंचे प्रत्युत्तर, सरकारला दिला इशारा
- Old Pension Scheme | जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा, कर्मचाऱ्यांना केले ‘हे’ आवाहन