Pune Pimpri Chinchwad Crime News | बिलाच्या पावत्या एडीट करून पैशांचा अपहार, वायसीएम हॉस्पिटलमधील प्रकार

पिंपरी : एन पी न्यूज 24 ऑनलाइन –Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) वेगवेगळ्या विभागांच्या कॅश काउंटरवर नेमलेल्या एका तरुणाने रुग्णांच्या बिलाच्या पावत्या एडीट करुन बिलाच्या रकमेचा अपहार (Embezzlement) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित तरुणावर फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 2023 ते 14 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वायसीएम हॉस्पिटलमधील कॅश काउंटर नं. 1 या ठिकाणी घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याप्रकरणी आदित्य अंकुश खंडागळे Aditya Ankush Khandagale (वय 23, रा. जाधववाडी, चिखली) याच्यावर आयपीसी 420, 406 465, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संजीव शांताराम भांगले Sanjeev Shantaram Bhangle (वय 57, रा. पिंपरी गाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य खंडागळे बीव्हीजी कंपनीतर्फे (BVG Company) वायसीएम रुग्णालयात
कामाला आहे. त्याच्याकडे कॅश काउंटरच्या कामकाजाची व कॅश स्वीकारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्याने रुग्णालयातील रक्त पेढी विभाग, एक्सरे विभाग, सोनोग्राफी विभाग, शव गृह विभागासाठी रुग्णालयाने
निश्चित केलेल्या रकमेच्या पावत्या एडीट करून बनावट पावत्या तयार केल्या. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून निश्चित केलेल्या रकमेप्रमाणे पैसे घेऊन त्यांना तशी पावती देत होता. परंतु जमा झालेली रक्कम त्याने रुग्णालयाच्या खात्यावर जमा न करता कमी रकमेच्या खोट्या पावत्या दाखवून रुग्णालयाची 68 हजार 260 रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे (PSI Ghadge) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Lok Sabha By-Election | पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
- ACB Trap News | लाच स्वीकारताना नगरपरिषदेचे मुख्यअधिकरी व विद्युत पर्यवेक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Actor Ravindra Berde Passed Away | ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन; अस्सल विनोदाचा धडाका हरपला
- Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या