Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर बलात्कार, लोणी काळभोर परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार (Rape In Pune) करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये वडकी गावाजवळील एका लॉजमध्ये घडला आहे. याप्रकरणी एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत फुरसुंगी येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) बुधवारी (दि.6) फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश रमेश बिराजदार Akash Ramesh Birajdar (रा. हांडेवाडी) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 354, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश याने फिर्यादी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
तिला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून वडकी गावाजवळील एका लॉजमध्ये नेले.
त्याठिकाणी गप्पा मारत असताना त्याने अश्लील चाळे केले. याला विरोध केला असता आरोपीने तरुणीसोबत
जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी
दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे (PSI More) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.