Cracked Heels Remedies | टाचांना खूप भेगा पडल्या? मऊ मुलायम टाचांसाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

Cracked Heels Remedies

एन पी न्यूज 24 ऑनलाइन – आपल्या संसकृतीत चेहऱ्याएवढंच महत्त्व पायाला दिलं आहे (Cracked Heels Remedies). स्वच्छ णि सुंदर पाय हे सौंदर्याचे एक लक्षण आहे. परंतु अनेकां बायकांना पायांना भेगा पडण्याच्या समस्येला सामोरे जावं लागतं. तुमची टाच पाण्याच्या आणि धुळीच्या संपर्कात आली, तर पायांना तडे जाण्याची शक्यता असते. टाचांना खोलवर भेगा पडल्यास आपल्याला खूप वेदना होतात. त्यामुळे त्याचासाठी इलाज करणं अत्यंत गरजेच असतं. जाणून घेऊया मऊ मुलायम टाचांसाठी काही घरगुती सोपे उपाय (Cracked Heels Remedies).

  1. खोबरेल तेल (Coconut Oil)

आपण अनेकदा केसांसाठी खोबरेल तेल वापरतो. खोबरेल तेलाचा उपयोग भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्यासाठी ही केला जातो. यामुळे टाचांना मॉइश्चरायझेशन तर राहतेच, परंतु तेलामुळे आपण भागातील इन्फेक्शन पासून (Infection In Heel Cracks) वाचू शकतो.

  1. केळी (Banana)

केळी तुमच्या त्वचेला कोरडी होण्यापासून वाचवते. 2 पिकलेली केळी कुस्करून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट पायाच्या टाचांवर 20 मिनिटे लावावी. यानंतर पाय चांगले धुवा आणि स्वच्छ करा. तुमची टाच साधारण २ आठवड्यांत बरी होईल.

  1. पाय कोमट पाण्याने साफ करणे (Cleans The Feet With Warm Water)

तुमच्या टाचांच्या भेगा (Heel Cracks) बऱ्या करण्यासाठी, तुमचे पाय कोमट पाण्यात सुमारे 20 मिनिटे भिजवा.
तुमच्या टाचांना स्क्रबरने घासून त्यात असलेली मृत त्वचा (Dead Skin) हळूहळू काढून टाका.
ते पाण्यातून काढून त्यावर मोहरीचे तेल लावा. त्यानंतर पायात मोजे घाला.
काही दिवसात पायाच्या भेगा कमी दिसायला लागेल (Cracked Heels Remedies).