Police Suspended | रेतीमाफियाशी संवाद, कॉल रेकॉर्डिंग अधीक्षक कार्य़ालयात पोहचताच पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

0

नागपूर : एन पी न्यूज 24 ऑनलाइन –Police Suspended | मागील चार महिन्यापासून पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेला रेती भरलेला टिप्पर सुपूर्तनाम्यावर सोडण्यासाठी टिप्पर मालक आणि पोलीस कर्मचारी (Nagpur Police) यांच्यातील संवाद पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचताच, या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई (Police Suspended) करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) रोजी करण्यात आली आहे. निलंबित पोलीस कर्मचारी आणि टिप्पर मालक (Tipper Owner) यांच्यातील 17 ऑडिओ क्लिप असून, यामध्ये पैशांची देवाण घेवाण, न्यायालयाचा अपमान आणि टिप्पर पळवण्या बाबत संभाषण आहे.

रसपाल बडगे (Raspal Bardge) असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचे (Police Suspended) नाव आहे. बडगे हा भिवापूर पोलीस ठाण्यात (Bhiwapur Police Station) पोलीस नाईक पदावर कार्य़रत आहे. परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राहुल झाल्टे (DySP Rahul Zalte) यांनी भिवापूरच्या ठाणेदार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी अवैध रेती वाहतूक (Illegal Sand Transport) करणारा टिप्पर ताब्यात घेतला होता. यातीलच एक टिप्पर मागील चार महिन्यापासून पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहे. दरम्यान, टिप्पर मालकाने न्यायालयातून सुपूर्तनामा आणल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी ते पोलीस ठाण्यात गेले.

दरम्यान, कागदोपत्री कार्यवाही पश्चात टिप्पर सोडल्या जात नसल्याबाबत टिप्पर मालक आणि पोलीस नाईक रसपाल बडगे
यांच्यात फोनवर संवाद झाला. यादरम्यान त्यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे कॉल रेकॉर्डिंगमध्ये ऐकायला
मिळत आहे. सुपूर्तनामा असून देखील महसूल विभागाच्या (Revenue Department) एका पत्रामुळे पोलीस विभाग
हा टिप्पट सोडत नसल्याने वैतागलेल्या मालकाने आणि पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवर मुक्त संवाद करत आहेत.
अशा एकूण 17 ऑडिओ क्लिप पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार (IPS Harsh Poddar) यांच्यापर्यंत पोहचल्याचे सुत्रांनी सांगितले.
त्यावर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई करुन रसपाल बडगे याला निलंबित करण्याचे आदेश काढले.

Leave A Reply

Your email address will not be published.