Benzer Paints | बेंझर पेंट्स आता एका नव्या रंगरूपात

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Benzer Paints | दसरा आणि दिवाळी हे रंगांचे सण आहेत. या दरम्यान आपण आपल्या घराला नवा रंग देऊन नवे रूप देत असतो. या काळात रंगांच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन बेंझर पेंट्सने (Benzer Paints) आपल्या ग्राहकांसाठी नव्या रूपातील रंगांची नवी मालिका सादर केली आहे. या मध्ये उच्च दर्जाच्या रंगांची विस्तृत श्रेणी असून तिचे बाजारात मोठे स्वागत होत आहे. यामुळे बेंझर पेंट्स च्या उत्पादनांना असलेली मागणी वाढली आहे, असे कंपनीचे संचालक प्रदीप अगरवाल (Director Pradip Agarwal) यांनी सांगितले.

रंगांच्या उद्योगातील नवा सितारा असलेल्या बेंझर पेंट्स ने उत्पादनांचे रंगरूप बदलले असून किंमत न वाढवता सुधारित गुणवत्ता आणण्यावर भर दिला आहे. यामुळे कंपनीच्या उत्पादनांना मोठी मागणी येत आहे. प्रत्येकालाच आपले घर नेहमी ताजेतवाने दिसावे असे वाटत असते आणि म्हणूनच घराला रंग देण्याचा पर्याय सर्वमान्य आहे. ग्राहकांच्या या प्रयत्नांना यश मिळावे या उद्देशाने कंपनीने नव्या रूपातील उत्पादने सादर केली आहेत. बेंझर पेंट्सची (Benzer Paints) उत्पादने पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर अशा आघाडीच्या शहरांत विकली जातात तसेच कर्नाटक, केरळ, तामिळनाडू अशा महत्वाच्या राज्यांमध्येही कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. श्री प्रदीप अगरवाल म्हणाले की भारतातील इतर राज्यात व्यवसायाचा विस्तार करण्याचा कंपनीचा इरादा आहे.

भारतातील रंग उद्योगाबद्दल अगरवाल म्हणाले की, देशात विकल्या जाणा-या रंगांपैकी ७० टक्के रंग हे गृह सजावटीसाठीचे रंग असतात. घरे सुशोभित करण्यासाठी ते वापरले जातात.
उर्वरित ३० टक्के रंग उद्योगक्षेत्रात वापरले जातात.
देशातील रंग व्यवसायाची व्याप्ती ७०,००० कोटी रुपये एवढी आहे आणि यात दरवर्षी १२ ते १५ टक्के वाढ होत आहे. येत्या पाच वर्षात रंगांची बाजारपेठ दुप्पट होईल, असे अगरवाल म्हणाले, बेंझर पेंट्स ला या बाजारपेठेतला एक मोठा घटक होण्याची उमेद आहे आणि त्यासाठी या नव्या रूपातली उत्पादने भारतभर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे बेंझर पेंट्स च्या उत्पादनांमध्ये वॉटर प्रूफ रंग, ऍक्रिलिक प्रायमर, ऍक्रिलिक डिस्टेम्पर, ऍक्रिलिक एक्सटर्नल इमल्शन पेंट, पावडर पुट्टी, डेकोरेटिव्ह पेंट्स, वॉटर बेस्ड प्रायमर सिमेंट पेंट्स आणि एक्सटर्नल वॉल पेंट्स अशा वैविध्यपूर्ण उत्पादनांचा समावेश आहे.

कंपनीने एक नवा विशेष वॉटर प्रूफिंग पेंट बाजार आणला आहे.
हा रंग सर्वोत्तम असून सर्वात दीर्घ काळ टिकणारा आहे.
कंपनीचा असा दावा आहे की या रंगामुळे घराच्या छताला नवी मजबुती मिळते आणि पाणी गळणे किंवा पाणी मुरणे
अशा समस्यांपासून ग्राहकाला दीर्घकाळ मुक्ती मिळते. अगरवाल म्हणाले की कंपनी गेली ४० वर्षे या व्यवसायात आहे
आणि ग्राहकांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्न करत त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे.
कंपनी नेहमीच ग्राहकाला आनंद आणि आराम वाटावा यासाठी प्रयत्न करते.
गुणवत्ता विषयक अनेक पुरस्कारानी कंपनीला गौरवण्यात आले आहे.
कंपनी समाजसेवेच्या क्षेत्रातही सतत आघाडीवर असते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.