ACB Trap News | 20 हजार रुपये लाच घेताना महापालिकेचा लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
ठाणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – ACB Trap News | दुकानाची घरपट्टी नावावर करुन देण्यासाठी 20 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) नालासोपारा वसई विरार महानगर पालिकेतील (Nalasopara Vasai Virar Municipal Corporation) ई प्रभाग समितीच्या लिपिकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.29) करण्यात आली. दृमील संजीव किणी (वय 34) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लिपीकाचे नाव आहे. (ACB Trap News)
याबाबत 58 वर्षीय व्यक्तीने ठाणे एसीबी (Thane ACB) कार्यालयात तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या दुकानाची घरपट्टी नावावर करण्यासाठी ई प्रभाग समिती येथे अर्ज केला होता. घरपट्टी नावावर करून देण्यासाठी दृमील किणी यांनी तक्रारदार यांचेकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 20 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. (ACB Trap News)
एसीबीच्या अधिकाऱ्या पडताळणी केली असता दृमील किणी याने तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी
करुन 20 हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार पथकाने बुधवारी सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच स्वीकारताना दृमील किणी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्याच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar), अप्पर पोलीस अधीक्षक सुधाकर सुरडकर
(Addl Sudhakar Suradkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष अंबिके (PI Santosh Ambike)
पोलीस अंमलदार संदिप सांबरे, विनायक जगताप, प्रीती जाधव, नवनीत सानप यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- ACB Trap News | जिल्हा परिषद आणि सामान्य रुग्णालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना एसीबीकडून अटक
- Mumbai-Pune Highway | मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताय? मग जाणून घ्या ३ तासांच्या ब्लॉकदरम्यान पर्यायी मार्ग
- PM Modi Cabinet Meeting | ‘गरिबांना आणखी ५ वर्षे मोफत रेशन’ प्रस्तावाला मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ मोठे निर्णय
- Gold-Silver Rate Today | सोन्याचा नवा विक्रम! चांदी देखील महागली, जाणून घ्या आजचे दर