Pune Crime News | मुलाकडून वयोवृद्ध आई-वडिलांना मारहाण, बोपोडी परिसरातील घटना; मुलाला अटक

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | दारु पिण्यासासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने वयोवृद्ध आईला बेदम मारहाण (Beating) करुन दात पाडून गंभीर जखमी केले. तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या वडिलांना देखील ढकलून देत जखमी केल्याचा प्रकार दापोडी येथे घडला आहे. याप्रकरणी मद्यपी मुलावर गुन्हा (FIR) दाखल करुन खडकी पोलिसांनी (Pune Police) त्याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सम्राट नगर येथे घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत ऑगस्टिन जो डिसुजा (वय-83 रा. सम्राट नगर, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन डॉमनिक ऑगस्टिन डिसूजा (वय-45 रा. प्लॉट नं. 24 सम्राट नगर, बोपोडी) याच्यावर आयपीसी 325, 284, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी त्यांची पत्नी व आरोपी मुलगा एकत्र राहतात.
आरोपी डॉमनिक याला दारु पिण्याचे व्यसन आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याने आई कडे
दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिला.
याचा राग आल्याने मद्यपी मुलाने आईच्या तोंडावर बुक्की मारुन दात पाडून जखमी केले.
त्यावेळी फिर्य़ादी पत्नीला सोडवण्यासाठी मध्ये गेले. त्यावेळी आरोपी मुलाने त्यांना शिवीगाळ करुन ढकलून दिले.
यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. फिर्यादी यांनी तक्रार देताच पोलिसांनी मद्यपी मुलावर गुन्हा दाखल करुन अटक
केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ (PSI Gunjal) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Police Suspended | रेतीमाफियाशी संवाद, कॉल रेकॉर्डिंग अधीक्षक कार्य़ालयात पोहचताच पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
- Benzer Paints | बेंझर पेंट्स आता एका नव्या रंगरूपात
- Pune Crime News | क्लिनीकमध्ये तपासणीसाठी गेलेल्या तरूणीसोबत अश्लील चाळे, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरवर गुन्हा; स्वारगेट परिसरातील घटना
- ACB Trap News | 20 हजार रुपये लाच घेताना महापालिकेचा लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात