Pune Crime News | मुलाला टिळा लावते, मुस्लिम मुलीप्रमाणे स्वयंपाक येत नाही म्हणून कौटुंबिक अत्याचार, पतीला अटक; कोंढवा परिसरातील घटना

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | आंतरजातीय विवाह (Intercaste Marriage) केलेल्या महिलेने तिच्या मुलाला हिंदू धर्माप्रमाणे टिळा लावल्याच्या कारणावरुन तसेच मुस्लिम मुलीप्रमाणे स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन कौटुंबिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Pune Police) पती आणि सासरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने सोमवारी (दि.27) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पोलिसांनी पती आणि सासरे यांच्यावर आयपीसी 498अ, 420, 377, 504, 506, 323, 34 नुसार गुन्हा दाखल करुन 31 वर्षीय पतीला अटक केली आहे. हा प्रकार 2014 पासून नाना पेठ, हडपसर, म्हाडा वसाहत, खडीमशीन चौक, मिठा नगर, कोंढवा या ठिकाणी घडला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पतीचा आंतरजातीय प्रेम विवाह
(Intercaste Love Marriage) झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. आरोपींनी वेळोवेळी कौटुंबिक कारणावरुन
फिर्यादी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. मुस्लीम मुलीप्रमाणे स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरुन
फिर्यादी यांना मारहाण (Beating) केली. फिर्यादी या मुलाला हिंदू धर्मानुसार टिळा लावत असताना आरोपी सासरे यांनी
चिडून जाऊन टिळा पुसून शाररिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच फिर्य़ादी याच्याकडील 6 तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) घेऊन परत केले नाहीत. तर पतीने फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा