Pune Pimpri Crime News | लक्ष्मी पुजनासाठी ठेवलेले पैसे व दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक

0

तळेगाव दाभाडे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | लक्ष्मीपूजन दिवशी पूजेसाठी ठेवलेले पैसे आणि दागिने चोरणाऱ्या एका महिलेला तळेगाव दाभाडे पोलिसांनी (Pimpri Police) अटक केली आहे. याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील रविवार पेठेत रविवारी (दि.12) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. (Pune Pimpri Crime News)

याबाबत महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नंदिनी अकबर पवार (वय-25 रा. मिरज, सांगली) व हरणी भोसले (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 380, 324, 34 नुसार गुन्हा दाखल करुन नंदिनी पवार हिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी लक्ष्मी पुजन असल्याने फिर्य़ादी यांच्या घरात पूजा करण्यात आली. पूजेसाठी फिर्यादी यांनी ताटामध्ये 1 लाख 68 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 10 हाजार रुपये रोख रक्कम ठेवली होती. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फिर्य़ादी घरामध्ये जप करत असताना दोन महिला व एक लहान मुलगा दारात आला. त्यांनी खायला मागिले असता फिर्य़ादी यांनी स्वयंपाक झाला नसल्याचे सांगून करंजी आणते असे म्हणून त्या स्वयंपाक घरात गेल्या. (Pune Pimpri Crime News)

याच संधीचा फायदा घेत आरोपी महिलांनी फिर्य़ादी यांनी पूजेसाठी ठेवलेले दागिने व पैसे चोरले. हा प्रकार फिर्यादी यांच्या
लक्षात येताच त्यांनी आरोपींकडे विचारणा केली. त्यावेळी फिर्यादी व आरोपी नंदिनी पवार यांच्यात झटापट झाली.
तसेच पळून जाण्यासाठी नंदिनी पवार हिने तिच्या सोबत असलेल्या
कुणाल अकबर पवार (वय-8) याच्या डोक्यात समई मारुन जखमी केले.
फिर्यादी यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आरोपींचा शोध घेऊन नंदिनी पवार हिला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.