PM Narendra Modi On Sharad Pawar | काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या, पंतप्रधानांच्या ऑफरवर शरद पवार म्हणाले, अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय…

0

पुणे : PM Narendra Modi On Sharad Pawar | नकली राष्ट्रवादी (Nakli NCP), नकली शिवसेना (Nakli Shivsena) पक्षाने काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होण्याचे मन तयार केले आहे. मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर या, सर्व स्पप्न पूर्ण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या सभेत (PM Modi Nandurbar Sabha) म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतला आहे. अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्याकडून कधीही होणार नाही, असे थेट प्रत्युत्तर पवार यांनी दिले आहे.

शरद पवार म्हणाले, देशामध्ये संसदीय आणि लोकशाही पद्धत मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांना तुरुंगात टाकण्यात आले. केंद्र सरकारच्या सहभागाशिवाय एवढी मोठी कारवाई होत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वासच नाही. हा समज आता लोकांमध्येही पक्का झाला आहे. अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्याकडून कधीही होणार नाही.

शरद पवार म्हणाले, गांधी-नेहरूंची विचारधारा आम्हाला प्रिय आहे. ती सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी एका भाषणात मुस्लीम समाजाबद्दल काहीतरी भाष्य केल्याचे आम्ही ऐकले. हा देश पुढे घेऊन जायचा असेल तर सर्वधर्मीयांना एकत्र घेऊन जावेच लागेल. एखाद्या समाजाला बाजूला ठेवून पुढे जाता येणार नाही. पंतप्रधान मोदी अलीकडे वारंवार एका धर्माच्या विरोधात भूमिका मांडत आहेत, अशी भूमिका मांडणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कधीही जाणार नाही.

शरद पवार म्हणाले की, आजकाल ते महाराष्ट्रात वारंवार येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या विचारांविरोधात जनमत तयार होत आहे. यामुळे त्यांच्यात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. त्यामुळे ते अशी संभ्रम निर्माण करणारी विधाने करत आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.