Devendra Fadnavis | पुण्यात आणखी नवीन प्रकल्प येतील, कायापालट होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पुणेकरांना आश्वासन

0

पुणे : Devendra Fadnavis | २०१४ पासून बदललेले पुणे आपल्याला बघायला मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी नवीन प्रकल्प पुण्यात येतील आणि पुण्याचा कायापालट होईल. त्यासाठी तिस‍ऱ्यांदा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पंतप्रधान करण्यासाठी १३ तारखेला मतदानावेळी मुरलीधर मोहोळ (Murlidha Mohol) यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

पुणे लोकसभा मतदार संघाचे (Pune Lok Sabha) महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारासाठी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बाणेर (Baner), पर्वती भागात सभा (Parvati) आयोजित करण्यात आली होती. यावेळी फडणवीस बोलत होते.

या सभेला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal), भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. याच दहा वर्षांत चांदणी चौकातील पुल, रस्ते, मेट्रो, इलेक्ट्रिक बस आल्या. तर सर्वाधिक इलक्ट्रिक बसेस पुण्यात आल्या आहेत. यामुळे प्रदूषण कमी झाले असून पुणेकर नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे. हे सर्व नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले आहे.

इंडिया आघाडीवर (India Aghadi) टीका करताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी विकासपुरूष आहेत. त्यांच्या समवेत वेगवेगळ्या १८ पक्षांची महायुती आहे. तर राहुल गांधी यांच्यासमवेत २४ पक्षांची खिचडी आहे. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. २४ नेते संगीत खुर्चीतून पाच वर्षे एक याप्रमाणे नेता निवडतील.

फडणवीस म्हणाले, १४० कोटी लोकांचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत. सबका साथ सबका विकास नरेंद्र मोदी करीत आहेत. तर दुसर्‍या बाजूला विरोधकांच्या इंजिनात कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.