Pune Crime News | पुणे गोळीबार प्रकरण : पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी केला सराफ व्यावसायिकावर गोळीबार

झटपट पैसे कमावण्यासाठी कंत्राटी कामगार बनले लुटारु

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | सराफी पेढी बंद करुन दुचाकीवरुन निघालेल्या सराफ व्यावसायिकाचा पाठलाग करुन करुन गोळीबार (Pune Firing Case) करत लुटल्याची घटना घोरपडी परिसरातील बी.टी. कवडे रस्त्यावर 8 नोव्हेंबर रोजी घडली होती. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्यातील आरोपींचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांची (Pune Police) पथके रवाना करण्यात आली होती. पोलिसांनी तीन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपी पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) कंत्राटी कामगार असल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

पुणे महापालिकेच्या कचरा संकल करणाऱ्या गाडीवर तिघेही कंत्राटी कामगार (PMC Contract Workers) होते. पण त्यांना झटपट पैसे कमावयचे होते. त्यासाठी तिघा मित्रांनी साराफी व्यावसायिक प्रतीक मदनलाल ओसवाल Pratik Madanlal Oswal (वय-30 रा. मुंढवा) यांना कट रचून लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सराफ व्यवसायिकावर गोळीबार करुन लुटमार करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट पाच आणि वानवडी पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. झटपट पैसे कमावण्यासाठी गुन्हा केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी सर्फराज शेख (वय-23), लखन अंकोशी (वय-35 दोघे रा. रामटेकडी, हडपसर), रफीक शब्बीर शेख (वय-30 रा. घोरपडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News)

घटनेच्या दिवशी आरोपी सय्यदनगर परिसरातील ओसवाल यांच्या पेढजवळ गेले. ते पेढी बंद करुन दुचाकीवरुन जात असताना सर्फराज, रफीक, लखन आणि त्यांच्या साथीदारांनी ओसवाल यांना बी.टी. कवडे रोडवर आडवले. त्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार करुन त्यांच्याकडील सोने लुटून आरोपी पसार झाले. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा तपास करुन अटक केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi),
उपनिरीक्षक चैत्राली गपाट, लोहोटे आणि पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.