Pune Crime News | ‘आमच्याकडे काय पाहतो?’ म्हणत तरुणावर चाकूने वार, खराडीमधील प्रकार

Beating

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | आमच्याकडे काय पाहतोस असे म्हणत एका तरुणावर तीन जणांनी चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.11) रात्री नऊच्या सुमारास खराडी येथील झिंग बिअर शॉपी समोर घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत गौरव गणेश कोकणे (वय-29 रा. आव्हाळवाडी, ता. हवेली) याने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन पवार व त्याच्या दोन साथीदारांवर आयपीसी 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन पवार व त्याचे इतर दोन मित्र दारुच्या नशेत होते. त्यांनी फिर्यादी गौरव याला तु आमच्याकडे काय पाहतो असे म्हणत त्याच्यासोबत वाद घातला. आरोपींनी फिर्यादी याची कॉलर पकडून शिवीगाळ करत हाताने मारहाण (Beating) केली. तसेच चाकूने फिर्यादी यांच्या डोक्यात, पाठीवर, हातावर व छातीवर सपासप वार करुन गंभीर जखमी केले. घटनेनंतर आरोपी पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गौरव याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा