MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकरांच्या आरोपाने खळबळ, ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील १७ लाख कुणाला द्यायचा?

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणात (Sassoon Hospital Drug Racket Case) आता आणखी एक खळबळजनक खुलासा पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. ललित पाटलाकडून (Lalit Patil) पोलीस आयुक्त कार्यालयाला हफ्ते दिले जात होते, असा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे. ललित पाटीलने चौकशीत सांगितले आहे की तो १७ लाख रूपये द्यायचा. मग आरोपी अधिकाऱ्यांकडून रकमेची वसुली करा आणि त्यांना अटक करा, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. (MLA Ravindra Dhangekar)
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, ललित पाटीलने कालच सांगितले की, मी १७ लाख रुपये देत होतो. ज्यांना ज्यांना पैसे दिले, त्यांची पोलिसांनी चौकशी केली नाही. मी दोन दिवसांपूर्वी तपास अधिकाऱ्यांना भेटलो आणि सांगितले की, आरोपी अधिकाऱ्यांकडून रकमेची वसुली करा आणि त्यांना अटक करा.
धंगेकर म्हणाले, काल शासनाचा अहवाल आला आणि त्यामध्ये ललित पाटील प्रकरणात ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर
(Dean Dr. Sanjeev Thakur) यांना पदमुक्त केले आहे. पण तो अहवाल एक नौटंकी आहे. संजीव ठाकुरांना वाचवण्याचे
काम सरकार करत आहे. खरे तर, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मी वारंवार करत आहे.
आमदार धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) पुढे म्हणाले, ललित पाटील प्रकरणी पोलीस व्यवस्थित चौकशी
करत असल्याचे दिसत नाही. पोलीस खाते गृहमंत्र्यांच्या आणि शासनााच्य दबावाखाली काम करत आहे.
पुण्यात हुक्का पार्लर, ड्रग्ज आणि अमली पदार्थांचे धंदे राजरोसपणे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत.
हे मी सातत्याने बोलत आहे. यावर पडदा टाकण्यासाठी पोलीस संजीव ठाकूर यांना अटक करत नाहीत.
धंगेकर यांनी सरकारला इशारा देताना म्हटले की, आज लाखो रुपये आयुक्त कार्यालयात हफ्त्याच्या रुपाने गोळा होतात.
हे जर ऐकले नाहीत, तर आम्ही लोकशाही पद्धतीने जे काही करता येईल ते करू.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा