Pune Crime News | पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन खून, येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरातील घटना

Lonavala Pune Crime News | A young man from Guhagar who was taking a darshan of a single deshi was beaten to death with an iron rod for giving way to a car.

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वी गोळीबार (Firing In Pune) करुन दोघांचा खून (Murder Case) केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरात एका 21 वर्षाच्या तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याची घटना बुधवारी (दि.1) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अभिषेक राठोड असे खून (Murder In Pune) झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ब्रह्मा सनसिटी परिसरात अभिषेक राठोड याच्यावर अज्ञातांनी कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिषेकचा जागीच मृत्यू झाला. खूनाच्या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerwada Police Station) पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. (Pune Crime News)

अभिषेकचा खून कोणी आणि कोणत्या कारणाने केला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.
याप्रकरणी रात्री उशिरा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस अधिक तपास
करत असून सीसीटीव्ही फुटेजच्याद्वारे आरोपींचा शोध घेत आहेत अशी माहिती
पुणे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा