Supriya Sule On Ajit Pawar | मी शरद पवारांचा मुलाग नाही म्हणून…, अजित पवारांच्या वक्तव्याचा सुप्रिया सुळेंनी घेतला समाचार

0

पुणे : Supriya Sule On Ajit Pawar | मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळालं, याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि दादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्या समोर आहे. सगळं स्पष्ट होईल. खूप सोप्प उत्तर आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. शिरुरमधील (Shirur Lok Sabha) महाविकास आघडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) प्रचारार्थ आयोजित सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपला पक्ष फुटला, चोरला, वगैरे वगैरे सुरू आहे, पण मी आज तेच म्हणते, प्यार से मांगा होता ना सबकुछ दे देते. नाती तोडायला ताकद लागत नाही. नाती जोडायला ताकद लागते. मंत्री पद महत्वाचे की निष्ठा महत्वाची? हे तुम्हीच सांगा.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिरूर लोकसभेचा आपला उमेदवार एक नंबरचा आहे. अमोल दादा माझ्या भावासारखा आहे. आपल्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, पण आता आपण मुक्त झालो आहोत. पुत्री प्रेमाचा पण आरोप केला गेला.

आढळराव पाटलांवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपले विरोधी उमेदवार म्हणत आहेत, ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला निवडून द्या. अगं बया, मी तर घाबरलेच. म्हणजे पुढील पाच वर्षे काम करणार नाहीत. वर्ष मोजत राहतील. मला तर आधी वाटले होते, की विरोधी उमेदवार शिवाजी आढळराव (Shivajirao Adhalrao Patil) माझ्या वडिलांच्या वयाचे असतील.

पण मगाशी मला समजलंकी अजित दादा, दिलीप वळसे आणि उमेदवार एकाच वयाचे आहेत, पण त्यांचा आदर करायला हवा. मात्र, ते म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे. ऐकून वाईट वाटले. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार, असा टोला सुप्रिया सुळे यांनी आढळरावांना लगावला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आजवर आपल्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होत आलेत, पण आता आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत नाहीत. आता आमच्यावर बोलून दाखवा. पण मी अशोक चव्हाणांची बाजू घेऊन तोंडावर पडले. आजवर भाजपने त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आणि चव्हाण अचानक भाजपवासी झाले.

सहा वर्षाची राज्यसभा त्यांना मिळाली. इथे मी आणि अमोल कोल्हे खासदार होण्यासाठी वणवण फिरतोय, आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांना आयती खासदारकी मिळाली, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली.

काय म्हणाले होते अजित पवार…

शिरूरच्या सभेत अजित पवार म्हणाले, शरद पवार आमचं दैवत आहे. त्याबद्दल दुमत नाही. पण प्रत्येकाचा काळ असतो. कुठेतरी ८० वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन त्यांना संधी द्यायला पाहिजे. मी त्यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसला न्याय?

आम्ही दिवसरात्र काम केलं. सगळा जिल्हा सांभाळला. शरद पवारांकडे जिल्हा बँक नव्हती. ती बँक वेगळे लोक सांभाळायचे. मी राजकारणात आल्यापासून बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवली आहे. यांचा प्रत्येक शब्द पाळला. मी शब्दाचा पक्का आहे. एकदा दिलेला शब्द पाळतो, असे अजित पवार म्हणाले होते. यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.