Pune Crime News | कौटुंबिक वादातून पत्नीवर अॅसिड फेकले, हडपसरमधील घटना
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | कौटुंबिक वादामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलेल्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. पत्नीने ही तक्रार मागे घ्यावी यासाठी पतीने तिच्या अंगावर अॅसिड (Acid) टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. ही धक्कादायक घटना हडपसरमधील भेकराईनगर येथे असलेल्या मोरया हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी श्रीहरी बब्रुवान नरवटे Srihari Babruwan Narwate (वय-35 रा. खरोसा, लातूर) याच्यावर आयपीसी 326अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत अनिता श्रीहरी नरवटे (वय-31 रा. भेकराईनगर) या जखमी झाल्या असून त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) बुधवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीहरी आणि अनिता हे दोघे पती-पत्नी आहेत.
कौटुंबिक वादामुळे ते दोघे काही वर्षांपासून विभक्त राहात आहेत.
फिर्यादी अनिता या मोरया हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिष्ट म्हणून काम करतात.
त्यांनी सासरच्या लोकांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. 31 ऑक्टोबर रोजी आरोपी श्रीहरी हॉस्पिटलमध्ये आला. त्याने ‘आमच्यावरील केस मागे घेत नाहीस ना… थांब तुला दाखवतो’ असे म्हणत सोबत आणलेले अॅसिड अनिता यांच्या अंगावर फेकले. या घटनेत अनिता गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन खून, येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरातील घटना
- पुण्यातील अट्टल गुन्हेगार छोट्या बलकवडे याच्यावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 53 वी स्थानबध्दतेची कारवाई
- सराईत चोरटा कोंढवा पोलिसांकडून गजाआड, तीन गुन्हे उघडकीस
- ड्रग्स माफिया ललितच्या जीवाला धोका असल्याचा वकिलांचा दावा ! ललित पाटीलला 7 नोव्हेंबर पर्य़ंत पोलीस कोठडी